युनियन अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने नवा लार्ज आणि मिडकॅप फंड बाजारात आणला आहे. ‘युनियन लार्ज अॅंड मिडकॅप फंड’ असे या नव्या योजनेचे नाव आहे. हा एक ओपन एन्डेड प्रकारातील फंड आहे. हा एनएफओ गुंतवणूकीसाठी 15 नोव्हेंबरला खुला झाला असून या फंडातील गुंतवणकीसाठीची अंतिम मुदत 29 नोव्हेंबर ही आहे. त्यानंतर 13 डिसेंबरपासून हा फंड पुन्हा गुंतवणूकीसाठी खुला असणार आहे.
नव्या ‘युनियन लार्ज अॅंड मिडकॅप फंडासाठी एस अॅंड पी बीएसई 250 लार्च अॅंड मिडकॅप टीआरआय हा बेंचमार्क असणार आहे. या फंडाचे व्यवस्थापन युनियन एएमसीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी विनय पहारिया करणार आहेत. या फंडात गुंतवणूकीसाठीची किमान रक्कम 5,000 रुपये इतकी आहे. या फंडाद्वारे मुख्यत: इक्विटी प्रकारात गुंतवणूक केली जाणार आहे. लार्ज आणि मिडकॅप प्रकारातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे.