टेस्ला इन्कॉर्पोरेशन, ग्लॅक्सोस्मिथलाईन यांच्यासह जवळपास 324 कंपन्यांना भारतात उत्पादन प्रकल्प सुरू करण्याची ऑफर  आली आहे. चीन आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचा लाभ घेत भारतात नवे उत्पादन किंवा निर्मिती प्रकल्प कंपन्यांनी सुरू करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. एका इंग्रजी संकेतस्थळावर या संदर्भात अहवालाची माहिती देण्यात आली आहे. सरकार या प्रकल्पांना आवश्यक जमीनीबरोबरच ऊर्जा, पाणी आणि रस्त्यांसारख्या पायाभूत पुरवणार आहे. 

Leave a Reply