अॅक्सिस अॅसेट मॅनेजमेंट कंपंनीने नवा फंड बाजारात आणला आहे. ‘अॅक्सिस रिटायरमेंट सेव्हिंग्ज फंड’ असे या नव्या म्युच्युअल फंड योजनेचे नाव आहे. हा एक ओपन एंडेड प्रकारातील फंड आहे. या फंडाद्वारे गुंतवणूकीचे तीन पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. ज्यामध्ये अॅग्रेसिव्ह, डायनॅमिक आणि कॉन्झर्व्हेटिव्ह अशा तीन प्रकारात गुंतवणूक करण्याची संधी आहे. याशिवाय या फंदात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना विनामूल्य विमा संरक्षण देखील दिले जाणार आहे. यासाठी एचडीएफसी लाईफ इंश्युरन्स बरोबर करार करण्यात आला आहे.
गुंतवणुकीच्या तीन पर्यायांपैकी अॅग्रेसिव्ह योजनेत 65-80 टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये, डायनॅमिक फंडामध्ये 65-100 टक्के आणि कॉन्झर्व्हेटिव्ह प्रकारात 40-80 टक्के गुंतवणूक डेट फंडात केली जाणार आहे. या एनएफओच्या (न्यू फंड ऑफर) माध्यमातून 800-1,000 कोटी रुपये उभा राहतील असा कंपनीचा प्रयत्न आहे. 29 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर या काळात हा एनएफओ ओपन असणार आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना ५ वर्षांचा ‘लॉक इन’ कालावधी असेल.
विमा संरक्षण हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्यात 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली तर एका वर्षामध्ये गुंतवणूकदाराकडून 1.2 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाते. अशा एसआयपीला 10.8 लाख रुपयांचा विमा मिळणार आहे.