सेबीने कार्व्ही स्टॉक ब्रोकिंग लि.ला अंतिरम देण्यास नकार दिला आहे.
सिक्युरिटिज अॅपेलेट ट्रिब्युनलने (एसएटी) कार्व्हीकडून मर्यादित मुखत्यारपत्र वापरण्यासंदर्भातील करण्यात विनंतीवर तपासणी करण्यास सांगितले होते. मात्र सेबीने कार्व्हीची अंतिरम दिलासा देण्याची विनंती नाकारली आहे. कार्व्हीकडून नियमांचे प्रचंड उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासाद्वारे लक्षात आल्यानंतर कार्व्हीला कोणतेही मुखत्यारपत्र वापरण्याची परवानगी सेबीकडून दिली जाणार नाही, अशी सूत्रांकडून देण्यात आली आहे.
एसएटीने कार्व्हीला ग्राहकांच्या व्यवहारांसंदर्भातील कामकाज पूर्ण करण्यास परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय घेण्यास सेबीला सांगितले होते. सेबीने निर्बंध घातल्यानंतर ग्राहकांचे व्यवहार अडकून पडल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपाची परवानगी देत हे व्यवहार पूर्ण करण्याचा कार्व्हीचा प्रयत्न आहे. त्यासाठीची विनंती त्यांनी केली होती. मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अशी कोणतीही सवलत कार्व्हीला देण्यास सेबीने नकार दिला आहे

अभिप्राय द्या!

Close Menu