खासगी क्षेत्रातील उदयोन्मुख आरबीएल बँक ‘प्रेफरेंशियल अलॉटमेंट’च्या मदतीने 826 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. पाच गुंतवणूकदारांच्या मदतीने हे भांडवल उभे केले जाणार आहे. यासाठी 340.70 रुपये प्रतिशेअर यानुसार 2.42 कोटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. या गुंतवणूकदारांना सध्याच्या 374.15 रुपये शेअर किंमतीत 9.8 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे.
बजाज फायनान्स लिमिटेड, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार – ईस्ट ब्रिज कॅपिटल मास्टर फंड I आणि एफईजी मॉरिशस एफपीआय लिमिटेड, वॉर्ड फेरी मॅनेजमेंट लिमिटेड-मॅनेज्ड हेज फंड, डब्ल्यूएफ एशियन रीकॉनॉईसन्स फंड आणि आशिया-केंद्रित स्टॉक हेज फंड आणि इशाना कॅपिटल या पाच संस्था बँकेत गुंतवणूक करणार आहेत.

 

अभिप्राय द्या!