नॅशनल स्टॉक एक्सचेंजने आज, सोमवार रोजी कार्व्ही स्टॉक ब्रोकिंग लिमिटेडचा ब्रोकिंग फर्म / दलाली पेढीचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे यापुढे कार्व्ही स्टॉक ब्रोकिंगला कॅपिटल मार्केट, फ्युचर अँड ऑप्शन्स, करन्सी डेरीव्हेटीव्हीज, म्यूचुअल फंड सेवा आणि कमॉडिटी  डेरीव्हेटीव्हीजचे व्यवहार करता येणार नाहीत. मुंबई  स्टॉक एक्सचेंजने देखील इक्विटी आणि डेट सेगमेंटमधील व्यवहारांपासून कार्व्हीचा परवाना रद्द केला आहे. सेबीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
ग्राहकांच्या परवानगीशिवाय शेअर्सची विक्री आणि त्यामार्फत ही रक्कम आपल्या रियल इस्टेट कंपनीत गुंतवल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.  या अगोदर जवळपास २,००० कोटी रुपयांच्या झाल्याच्या संशयावरून ‘सेबी’ने काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोकिंगवर नवीन गुंतवणूकदारांची नोंदणी करण्याला बंदी घालणारी कारवाई केली होती. काव्‍‌र्हीकडे सध्या सुमारे अडीच लाख डीमॅट खातेधारक असून, त्यांचे नियमित गुंतवणूक व्यवहार याच दलाली पेढीमार्फत सुरू होते. मात्र आता परवाना रद्द झाल्याने या प्रकारचे व्यवहार देखील करता येणार नाहीत.

 

अभिप्राय द्या!

Close Menu