भारत बॉण्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड किंवा ईटीएफ सुरू करण्याला मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. कॉर्पोरेट बॉण्ड ईटीएफ स्वरूपाची ही देशातील पहिलीच योजना आहे. सरकारी मालकीच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांद्वारे हे बॉण्ड्स इश्यू केले जातील. डेट म्युच्युअल फंडांप्रमाणेच या योजनेत गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.  ‘भारत बॉण्ड ईटीएफ’साठी ए ए ए चे रेटिंग निश्चित करण्यात आले आहे. कमीत कमी 1 हजार रुपयांच्या गुंतवणुकीसह तीन ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे.
नाबार्ड, एनएचपीसी, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आरईसी, नेशनल हाउसिंग बैंक, इंडियन रेल्वे फायनान्स  कॉर्पोरेशन, पॉवरग्रीड, बीपीसीएल, इंडियन ऑइल, कोंकण रेल्वे, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, एक्सपोर्ट-इंपोर्ट बँक, टीएचडीसी इंडिया, हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नॉर्थ इस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन यांच्यामार्फत हे बॉण्ड ईटीएफ इश्यू केले जाणार आहेत. यापैकी कोणत्याही कंपनीतील सरकारी मालकी 50 टक्क्यांच्या खाली आल्यास ती कंपनी या यादीतून काढली जाईल.

 

अभिप्राय द्या!

Close Menu