मोतीलाल ओस्वाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने दोन लार्ज कॅप इंडेक्स फंड बाजारात आणले आहेत. ‘मोतीलाल ओस्वाल निफ्टी 50 इंडेक्स फंड’ आणि ‘मोतीलाल ओस्वाल निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड’ अशी या नव्या फंडांची नावे आहे. या दोन्ही फंडाचा एनएफओ 3 डिसेंबरला खुला झाला असून त्याची अंतिम मुदत 17 डिसेंबर 2019 ही आहे. निफ्टी 50 आणि निफ्टी नेक्स्ट 50 या भारतातील दोन लोकप्रिय निर्देशांकावर हे दोन्ही नवे इंडेक्स फंड आधारलेले आहेत.
‘गुंतवणूकदारांच्या गरजा लक्षात घेऊन छोट्यात छोटी म्हणजे अगदी 500 रुपयांपासूनची गुंतवणूक करता यावी हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन आम्ही हे दोन फंड बाजारात आणले आहेत. आमच्या इंडेक्स फंडांना गुंतवणूकदार आणि गुंतवणूक सल्लागार या दोघांचाही उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे’, असे मत मोतीलाल ओस्वाल म्युच्युअल फंडाचे व्यवस्यापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सोमय्या यांनी व्यक्त केले आहे.
दोन वर्षांपूर्वी सेबीने म्युच्युअल फंडांचे पुनर्वर्गीकरण केल्यानंतर लार्ज कॅप प्रकारातील म्युच्युअल फंडाचा परतावा यावर चिंता व्यक्त केली जात होती. या नव्या म्युच्युअल फंड योजना ही बाब लक्षात घेऊन शेअर बाजारातील टॉप 100 कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणार आहेत. 
 
मागील दीड वर्षात फंड मॅनेजरद्वारे व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या लार्ज कॅप फंडांपेक्षा इंडेक्सशी जोडलेल्या लार्ज कॅप फंडाची कामगिरी उजवी झाल्याचे दिसून आले आहे. स्वप्नील मयेकर हे ‘मोतीलाल ओस्वाल निफ्टी 50 इंडेक्स फंड’ आणि ‘मोतीलाल ओस्वाल निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड’ या दोन्ही इंडेक्स फंडांचे फंड व्यवस्थापन करणार आहेत.

अभिप्राय द्या!