देशातील सर्वात जुनी म्युच्युअल फंड कंपनी असलेली युटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आपला 8.25 टक्के हिस्सा आयपीओद्वारे विकणार आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाचा युटीआय एएमसीमध्ये असलेला हिस्सा बाजारात विकण्याचा युटीआयचा प्लॅन आहे. सध्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाचा युटीआय एएमसीमध्ये 18.25 टक्के हिस्सा आहे. त्यातील 8.25 टक्के हिस्सा युटीआय ऑफर फॉर सेल (ओएफएस) च्या माध्यमातून आयपीओद्वारे बाजारात आणणार आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने युटीआय एएमसीमधील हिस्सा विकण्याच्या प्रस्तावाला मंजूली दिली आहे. आयपीओच्या माध्यमातून युटीआय एएमसी 1 कोटी 4 लाख 59 हजार 949 इक्विटी शेअर बाजारात आणणार आहे. सेबीच्या मंजूरीसाठी हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
युटीआय एएमसीमध्ये चार देशांतर्गत गुंतवणूकदार आहेत. यात एलआयसी, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा यांचा प्रत्येकी 18.5 टक्के हिस्सा आहे. याव्यतिरिक्त या सर्वांच्याच स्वतंत्र अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यासुद्धा आहेत.

Leave a Reply