देशातील आघाडीची म्युच्युअल फंड कंपनी मोतीलाल ओसवालने दोन इंडेक्स फंड योजना बाजारात दाखल केल्या आहेत. मोतीलाल ओसवाल निफ्टी 50 इंडेक्स फंड आणि मोतीलाल ओसवाल निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड असे या दोन्ही योजनांची नावे आहेत. हे दोन्हीही फंड पॅसिव्ह प्रकारात मोडतात. यानिमित्ताने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी 50 या निर्देशांकात गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे.
ओपन एंडेड प्रकारातील या योजना आहेत. ज्या गुंतवणूकदारांना निफ्टी 50 या निर्देशांकात येणाऱ्या तेजीचा फायदा एसआयपीच्या माध्यमातून घ्यायचा आहे अशांसाठी ही योजना चांगला पर्याय ठरू शकते. 3 ते 17 डिसेंबर दरम्यान योजनांचा न्यू फंड ऑफर (एनएफओ) गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येणार आहे.

 

अभिप्राय द्या!