नोव्हेंबर महिन्यात म्युच्युअल फंड व्यवसायात मोठी अस्थिरता दिसून आली. एका बाजूला क्रेडिट रिक्स फंडामधून गुंतवणुकदारांनी पैसा काढून घेतला तर इक्विटी प्रकारातील म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणुकीत 85 टक्क्यांची घट झाली. नोव्हेंबरमध्ये इक्विटी प्रकारातील योजनांमध्ये 933 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यात इक्विटी प्रकारातील गुंतवणूकीत मोठी घट झाली आहे. यात गुंतवणूकदारांनी नफा मिळवण्यासाठी गुंतवणूक काढून घेणे हेसुद्धा एक कारण आहे. तरीसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायातील एकूण गुंतवणूक आतापर्यतच्या सर्वाधिक पातळीवर म्हणजे 27 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे,