येत्या 9 जानेवारीपासून शेअर बाजार, म्युच्युअल फंड, यूलिप्स आणि एनपीएस सारख्या योजनांतील गुंतवणूक महाग होणार आहे. शेअर्स, डेरिव्हेटीव्ह करंन्सी आणि कमॉडिटीज मध्ये होणाऱ्या व्यवहारांवर पुन्हा एकदा मुद्रांक शुल्क कर लागू होणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने बुधवारी एक परिपत्रक काढले आहे. मुद्रांक शुल्क राज्याच्या अखत्यारीत असल्याने राज्यांनुसार तो वेगवेगळा आकारला जायचा मात्र नवीन परिपत्रकानुसार सरकारने समान मुद्रांक शुल्क दर अधिसूचित केले आहेत.
या अगोदर डिमॅट स्वरूपातील वित्तीय सिक्युरिटीजच्या व्यवहारावरील मुद्रांक कर रद्द करण्यात आला होता. मात्र 2019 च्या अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे तो पुन्हा एकदा समान (युनिफॉर्म) पद्धतीने लागू होणार आहे.
म्युच्युअल फंड, यूलिप्स किंवा एनपीएस मध्ये होणारी गुंतवणूक शेअर्स, डेरिव्हेटीव्ह करंन्सी आणि कमॉडिटीज मध्ये होणाऱ्या व्यवहारांमध्ये केली जाते. त्यामुळे यातील गुंतवणूक देखील तुलनेने महाग होणार आहे.

 

अभिप्राय द्या!