प्रीन्सिपल म्युच्युअल फंडने आज आपल्या प्रिन्सिपल मिडकॅप फंडाच्या न्यू फंड ऑफरची (एनएफओ) घोषणा केली. ही एक खुली इक्विटी योजना असून, प्रामुख्याने मिडकॅप समभागांमध्ये गुंतवणूक करते. मिडकॅप कंपन्यांच्या समभागांत तसेच समभागांशी संबंधित योजनांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन मुद्दल अधिमूल्यनाचे उद्दिष्ट या योजनेपुढे आहे. एनएफओ आज खुला झाला आणि २० डिसेंबर २०१९ रोजी तो बंद होईल. प्रिन्सिपल म्युच्युअल फंडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ललित विज यांनी या लाँचबद्दल त्यांचे विचार मांडले. ते म्हणाले, “मिडकॅप गुंतवणुकीचा विचार करण्याची ही अगदी योग्य वेळ आहे असे आम्हाला वाटते आणि प्रिन्सिपल असेट मॅनेजमेंट आपल्या सुयोग्य गुंतवणूक क्षमतांच्या जोरावर गुंतवणूकदारांना चांगला मोबदला मिळवून देणाऱ्या मिडकॅप गुंतवणुकीचा अनुभव देण्याच्या स्थितीत आहे.”
 
प्रिन्सिपल मिडकॅप फंड स्मार्ट आणि माय गेन यांसारख्या सुविधाही देऊ करतो. स्मार्ट ही एक एक्स्लुजिव सुविधा असून, एनएफओ कालावधीत उपलब्ध आहे. या सुविधेमुळे एकरकमी गुंतवणुकीचा वापर करून बाजारातील योग्य वेळ साधण्यातील जोखीम (मार्केट-टायमिंग रिस्क) हाताळली जाते. स्मार्टच्या माध्यमातून गुंतवणूकदार मिडकॅप फंडातील त्यांच्या गुंतवणुकीमध्ये फेरफार करून ती ४ समान भागांत विभागू शकतात. यामुळे केवळ २५ टक्‍के उपयोजन निधी थेट प्रिन्सिपल मिडकॅप फंडात गुंतवला जाईल, तर उर्वरित ७५ टक्‍के पैसा प्रिन्सिपल कॅश मॅनेजमेंट फंडात गुंतवला जाईल. वितरणाच्या तारखेपासून बेंचमार्क इंडेक्स ३ टक्के घसरला तर स्मार्ट सुविधा सक्रिय होईल आणि प्रारंभिक गुंतवणुकीपैकी २५ टक्‍के आपोआप प्रिन्सिपल मिडकॅप फंडात हलवली जाईल. अन्य परिस्थितीत महिन्याच्या अखेरीस रक्कम प्रिन्सिपल कॅश मॅनेजमेंट फंडातून प्रिन्सिपल मिडकॅप फंडात हलवला जातो. थोडक्यात, बाजारातील वेळ साधण्याची जोखीम या सुविधेमुळे कमी होते.
 
माय गेन सुविधेमध्ये गुंतवणूकदाराला मोबदल्‍याचा लक्ष्यदर निश्चित करण्याची मुभा मिळते. त्यामुळे एक स्वयंचलित कळ (ट्रिगर) सक्रिय होते आणि लक्ष्यदर साध्य झाला की आपोआप अधिमूल्यनामुळे मिळालेला पैसा गुंतवणूकदाराच्या पसंतीच्या अन्य फंडात हलवला जातो.

अभिप्राय द्या!