म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितसंबंध जोपासण्यासाठी तसेच म्युच्युअल फंडाविषयी गुंतवणूकदार जनजागृती करण्यासाठी आवश्यक त्या सूचना करण्यासाठी सेबीने एक आठ सदस्यीय समिती गठीत केली आहे. ही समिती चर्चासत्रे, प्रशिक्षण, संशोधन कार्यक्रम आणि प्रकाशने यासारख्या उपक्रमांची शिफारस करेल.
आयआयएम – अहमदाबादचे माजी प्राध्यापक अब्राहम कोशी हे या समितीचे अध्यक्ष असतील. आदित्य बिर्ला सन लाइफचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बालसुब्रमण्यन हे म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधी म्हणून या समितीचे सदस्य आहेत. त्याच बरोबर शेअर बाजार नियामक संस्था सेबीच्या वतीने तीन सदस्यांचा समावेश आहे: सेबीचे मुख्य महाव्यवस्थापक एन. हरिहरन आणि कार्यकारी संचालक नागेन्द्र पारख व व्ही. एस. सुंदरसन हे ते तीन सदस्य आहेत.
या पाच सदस्यांव्यतिरिक्त एमेरिटस कंपनीचे  एन. एल. भाटिया, ब्रँड-बिल्डिंग डॉट कॉमचे संस्थापक एम. जी. परमेश्वरन आणि कॅन्कोचे संस्थापक रमेश नारायण हेदेखील समितीचे सदस्य आहेत.

 

अभिप्राय द्या!