वर्षभरात कितीहीवेळा पैसे डिपॉझिट करता येणार
‘पीपीएफ’विषयीच्या नव्या नियमानुसार पीपीएफ खातेधारकांना ‘पीपीएफ’ खात्यात एका वर्षात ५० रुपयांच्या पटीत कितीही वेळा पैसे भरता येणार आहेत. मात्र ही रक्कम दिड लाखांहून अधिक नसावी. यापूर्वी खातेधारकाला एका वर्षात केवळ १२ वेळा पैसे जमा करण्याची परवानगी होती.

– मुदतपूर्ती पूर्वी खाते बंद करण्यासाठी आणखी एक अट
‘पीपीएफ’ खाते सुरु केल्यानंतर पाच वर्ष पूर्ण झाल्यावर विशिष्ट परिस्थिती खाते बंद करण्याची परवानगी आहे. ज्यात खातेधारकाला तसेच त्यावर अवलंबून असलेल्या पत्नी किंवा मुलांना गंभीर आजार झाल्यास पीपीएफ खाते मुदतपूर्ती पूर्वी बंद करण्याची परवानगी आहे. त्याशिवाय खातेधारक किंवा त्याच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पीपीएफ खाते मुदतपूर्ती पूर्वी बंद करता येईल. मात्र हा दावा करताना पीपीएफ खातेधारकांना सबळ कागदपत्रे सादर करावी लागतील. या दोन नियमांप्रमाणे आणखी एक अट सरकारने घातली आहे. ज्यात खातेदार दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारणार असल्यास या परिस्थितीत त्याला पीपीएफ खाते मुदतपूर्ती पूर्वी बंद करता येईल.

पीपीएफ खातेधारकांना कर्ज फेड करताना दिलासा मिळणार आहे. नव्या नियमानुसार कर्जावरील व्याजदर हे पीपीएफ निधीवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा १ टक्का अधिक असेल. यापूर्वी तो २ टक्के होता. जर खातेधारकाचे निधन झाल्यास त्याच्या वारसाला रीतसर कर्ज फेडावे लागेल.

– २५ हजारांहून अधिक रकमेचे चेक जमा होणार
टपाल विभागाने पीपीएफ खात्यात नाॅन होम पोस्ट आॅफिस शाखेत कितीही रक्कम पोस्टाच्या बचत खात्यात जमा करण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी २५ हजारांची परवानगी होती.

– पोस्टाच्या बचत खात्याचे चेक स्वीकारणार
सीबीएस पोस्ट आॅफिसमधून जारी होणारे चेक सीबीएस पोस्ट आॅफिसमध्ये आल्यास त्यांना यापुढे क्लीअरिंग हाऊसला पाठवले जाणार नाही. २५ हजारांहून अधिक रकमेचे पोस्टाच्या बचत खात्याचे चेक पीओएसबी/आरडी/पीपीएफ/एसएसए सारख्या योजनांमध्ये जमा करण्यासाठी सर्वच पोस्ट कार्यालात स्वीकारले जातीत.

अभिप्राय द्या!