पिरामल एंटरप्राईझेस बॉंड बाजारात आणून 2,750 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून हे बॉंड बाजारात आणले जाणार आहे. 28 डिसेंबरला पिरामल एंटरप्राईझेसच्या संचालक मंडळाच्या प्रशासकीय समितीची बैठक होणार असून त्यात हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कंपनी नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचरच्या माध्यमातून 2,750 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे.

अभिप्राय द्या!