मुकेश अंबानी यांच्या नैतृत्वाखालील मुख्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने समूहाची उपकंपनी आणि रिलायन्स रिटेल शेअरधारकांसाठी  ‘शेअर स्वॅप’ ऑफर जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत रिलायन्स रिटेलच्या शेअरधारकांना चार शेअरच्या बदल्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचा एक शेअर देण्यात येणार आहे.
 
2006 साली स्थापन झालेली रिलायन्स रिटेल ही रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे. या उपकंपनी अंतर्गत रिलायन्स फ्रेश, रिलायन्स स्मार्ट या प्रकारचे 45 वेगवेगळे व्यवसाय चालविले जातात. कंपनीच्या स्थापनेवेळी, ‘रिलायन्स रिटेल एम्प्लॉईज’साठी रिस्ट्रिक्टेड स्टॉक युनिट योजना 2006 आणि 2007 या दोन योजना राबविल्या होत्या. ज्यांतर्गत पात्र कर्मचार्‍यांना रिलायन्स रिटेलचे शेअर देण्यात आले होते. रिलायन्स रिटेल ही कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत  नसल्याने शेअर धारकांना शेअर लिक्विडेट करता येत नसल्याने कंपनीने ‘शेअर स्वॅप’ ऑफर जाहीर केली आहे. 

अभिप्राय द्या!