परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (एफपीआय) भारतीय भांडवली बाजारात गुंतवणूक करण्याचा ओघ यावर्षी (2019) प्रचंड राहिला आहे. एफपीआयकडून भारतीय भांडवली बाजारात यावर्षी तब्बल 1 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे. विशेष म्हणजे 2013 नंतर पहिल्यांदाच एफपीआय गुंतवणुकीने 1 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. एकूण गुंतवणुकीपैकी 1 लाख 86 कोटी रुपये इक्विटी प्रकारात तर 26 हजार 809 कोटी रुपये डेट प्रकारात गुंतविले आहेत. नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी ली.ने (एनएसडीएल) ही आकडेवारी प्रकाशित केली आहे.
महत्वाचे म्हणजे, या अगोदर फक्त तीनच वेळा 2010, 2012 आणि 2013 मध्ये एफपीआयकडून 1 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झाली होती. तर 2018 मध्ये गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेकडे पाठ फिरवली होती. मागील वर्षी इक्विटीतुन 33 हजार कोटी तर डेट गुंतवणुकीतून तब्बल 47 हजार कोटींची गुंतवणूक एफपीआय गुंतवणूकदारांनी काढून घेतली होती.