दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. (डीएचएफएल)वर विविध बॅंका, वित्तसंस्था, बॉंडधारक, कर्मचारी आणि इतर घेणेकऱ्यांनी तब्बल 87,905.6 कोटी रुपयांचा दावा लावला आहे. कर्जाच्या विळख्यात सापडलेली डीएचएफएल सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरी जाते आहे. कंपनी विविध वित्तसंस्था, बॅंका आणि गुंतवणूकदारांना देणे असलेल्या रकमेची माहिती कंपनीच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. 
 
यात डीएचएफएलच्या मुदतठेवींदारांचा समावेश नाही. मुदतठेवींचे 6,188 कोटी रुपयांच्या क्लेमवर कंपनीकडून मार्ग काढण्यात आला आहे. डीएचएफएलचे प्रशासक आर सुब्रमनीयाकुमार यांच्याकडे यांसंदर्भातील तोडगा कंपनीने सादर केला आहे. डीएचएफएलला कर्ज देणाऱ्या वित्तसंस्था, बॅंका आणि बॉंडधारकांचे एकत्रितरित्या कंपनी 86,892.3 कोटी रुपयांचे देणे लागते. तर बॉंडधारकांचे यात 45,550.7 कोटी रुपये आहेत. तर उर्वरित कर्ज देणाऱ्या संस्थांचे 41,342.23 कोटी रुपये डीएचएफएलकडे थकलेले आहेत.

अभिप्राय द्या!