टाटा म्युच्युअल फंडाने ‘टाटा क्वांट फंड’ हा आर्टिफिशिअल इंटलिजन्स (एआय) व मशीन लर्निंग (एमएल) यांचे पाठबळ असणारा फंड दाखल केला आहे. हा प्रोप्रायटरी क्वांट पद्धतीचा वापर करणारा फंड बाजारातील तेजीच्या वेळी जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणे आणि बाजारातील मंदीच्या वेळी कमीत कमी नुकसान करून घेणे, हे उद्दिष्ट असणाऱ्या गुंतवणूक पोर्टफोलिओची निर्मिती करण्यासाठी असून त्यामध्ये विवध रुल इंजिन व प्रेडिक्टिव्ह मॉडेल यांची सांगड घातली आहे.
 
पोर्टफोलिओ निर्माण करण्यासाठी रुल इंजिन बनवण्यासाठी स्टॉक परताव्याचे विस्तृत व सातत्यपूर्ण घटक विचारात घेतले जातात. ‘मूल्य’, ‘गुणवत्ता’, ‘गती’, ‘आकार’ अशी वैशिष्ट्ये आणि अन्य काही वैशिष्ट्यांची सांगड घालून पोर्टफोलिओ निर्माण करण्यासाठी प्रत्येक रुल इंजिन स्कोअरिंगचा वापर करते. त्यानंतर, बाजारातील सद्यस्थिती व स्थूल आर्थिक घटक यानुसार, पुढील महिन्यात कोणते वैशिष्ट्य उत्तम कामगिरी करेल या अंदाजानुसार, एमएलचे पाठबळ असणारे प्रेडिक्टिव्ह अल्गेरिदम पोर्टफोलिओ तयार करते.
 
अल्गोरिदम पुढील महिन्यासाठी उत्पन्नाच्या दिशेचाही (सकारात्मक किंवा नकारात्मक) अंदाज वर्तवते. अंदाजित उत्पन्न सकारात्मक असलेल्या महिन्यांसाठीच केवळ निवडक पोर्टफोलिओसाठी इक्विटीतील दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार केला जातो. ज्या महिन्यांसाठी अंदाजित उत्पन्न नकारात्मक असते तेव्हा अगोदरच्या दीर्घकालीन इक्विटीच्या हेजिंगसाठी डेरिव्हेटिव्ह धोरण अवलंबले जाते. कमीत कमी जोखीम पत्करून जास्तीत जास्त कामगिरी करण्यासाठी टाटा क्वांट फंड दरमहा पोर्टफोलिओचे संतुलन साधणार.
 
छुपे सहसंबंध व पद्धती यांचे विश्लेषण करण्यासाठी प्रेडिक्टिव्ह इंजिन गेल्या 20 वर्षांतील बाजाराविषयी व स्थूल आर्थिक घटकांविषयी माहितीची मदत घेते. त्यानंतर, मासिक अंदाज वर्तवण्यासाठी हे इंजिन सर्व सहसंबंध, तसेच बाजारातील सद्यस्थिती व स्थूल आर्थिक घटक यांचा वापर करते. म्हणूनच, फंडाची गुंतवणूकविषयक निर्णय घेण्याची प्रक्रिया पूर्णतः मशीनवर आधारित आहे आणि त्यामध्ये मनुष्याच्या मतांचा समावेश नाही. 

या फंडासाठी अर्जाची किमान रक्कम 5,000 रुपये आहे आणि त्यानंतर 1 रुपयाच्या पटीत अर्ज करता येईल आणि त्यानंतर 1,000 रुपयाची अतिरिक्त गुंतवणूक करता येईल व त्यानंतर 1 रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल. फंडाचे व्यवस्थापन शैलेश जैन करणार आहेत.
एनएफओला 03 जानेवारी 2020 रोजी सुरुवात झाली असून  आणि 17 जानेवारी 2020 रोजी सांगता होईल !!

अभिप्राय द्या!