डिसेंबरमध्ये नियोजनबद्ध गुंतवणूक योजनांमधून (SIP) तब्बल ८५१८ कोटींची गुंतवणूक झाली आहे. ‘SIP’मधून एका महिन्यातील आजवरची सर्वाधिक गुंतवणूक आहे.
म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संघटना असलेल्या असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये ‘SIP’मधून ८५१८.४७ कोटींची गुंतवणूक झाली. यात नोव्हेंबरच्या तुलनेत २४५ कोटींची वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये ‘SIP’मधून ८२७२ कोटींची गुंतवणूक झाली होती. हा ओघ वाढल्याने ‘SIP’मधील एकूण मालमत्ता ३.७१ लाख कोटींवर गेली आहे. २ कोटी ९७ लाख ‘SIP’ गुंतवणूकदार आहेत. ‘SIP’मधील गुंतवणूक वाढत असली तरी इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आहे. इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक डिसेंबरमध्ये ७८ टक्क्यांनी कमी झाली. गुंतवणूकदारांनी १३११ कोटी इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवले.