मिराई अॅसेट म्युच्यूअल फंडाने मिराई अॅसेट निफ्टी नेक्स्ट फिफ्टी ईटीएफ हा  नवीन म्युच्यूअल फंड बाजारात आणला आहे. हा मुदतमुक्त फंड असून तो निफ्टी नेक्स्ट फिप्टी टोटल रिटर्न्स इंडेक्स निर्देशांकानुसार गुंतवणूक करणार आहे. हा ईटीएफ प्रकारातील फंड असुन मिराईतर्फे आणलेला दुसरा ईटीएफ फंड आहे. ही योजना येत्या तेरा जानेवारीला गुंतवणूकीसाठी खुली होणार असून 21 जानेवारीला बंद होणार आहे. त्यानंतर 27 जानेवारीपासून नियमित खरेदी-विक्रीसाठी ही योजना गुंतवणूकदारांना पुन्हा खुली होणार आहे.

मिराई अॅसेट म्युच्यूअल फंडाने गेल्या दहा वर्षात भारतीय म्युच्यूअल फंड उद्योगात आपला दबदबा निर्माण केला असून 31 डिसेंबर 2019 अखेर फंड तब्बल 41 हजार 887 कोटी रुपयांच्या निधीचे यशस्वीरित्या व्यवस्थापन सांभाळत आहे. फंडाच्या निधीत यंदाच्या आर्थिक वर्षात तब्बल 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. निधी व्यवस्थापनच्या दृष्टीकोनातून मिराई अॅसेट म्युच्यूअल फंड हा वेगाने वाढणाऱ्या फंडापैकी एक फंड ठरला आहे. फंडाकडे तीस नोव्हेंबर 2019 अखेरपर्यंत 21 लाख नियमित गुंतवणूकदार असून त्यातील एसआयपी गुंतवणूकदारांची संख्या ही तब्बल आठ लाख एवढी आहे. एसआयपीच्या रुपाने फंडाकडे नोव्हेंबरअखेरीस दरमहा 474 कोटी रुपयांचा ओघ सुरु होता. मिराई अॅसेटच्या सध्या 7 इक्विटी फंड, 5 डेट फंड, 2 हायब्रीड फंड आणि प्रत्येकी एक मुदतबंद म्यॅच्युरिटी आणि ईटीएफ फंड योजना शेअरबाजारात सुरु आहेत.

अभिप्राय द्या!