म्युच्युअल फंड कंपन्यांनी येस बॅंकेतील त्यांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. डिसेंबर महिन्यात देशातील म्युच्युअल फंड कंपन्यांनी येस बॅंकेतील गुंतवणूकीचा हिस्सा कमी करून 5.09 टक्क्यांवर आणला आहे. सप्टेंबर 2019अखेरीस म्युच्युअल फंड कंपन्यांच्या येस बॅंकेतील हिस्सा 9.26 टक्के इतका होता. म्युच्युअल फंड कंपन्यांची येस बॅंकेतील मार्च 2013 नंतरची ही सर्वात कमी गुंतवणूक आहे. 
 
मार्च 2013 म्युच्युअल फंडांचा येस बॅंकेतील हिस्सा 3.75 टक्के इतका होता तर जून 2013 मध्ये 5.44 टक्के इतका हिस्सा होता. मार्च 2005 मध्ये हा हिस्सा सर्वाधिक नीचांकीवर म्हणजे 2.4 टक्के इतका होता. येस बॅंकेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या धोरणात्मक गुंतवणूकदारांच्या गुणांकनासंदर्भातील चिंतेमुळे म्युच्युअल फंड कंपन्यांनी सावध पावित्रा घेतला आहे. 
 
शिवाय रिझर्व्ह बॅंक एसपीजीपी होल्डिंग्स आणि एर्विन सिंग ब्राईच यांच्या येस बॅंकेतील गुंतवणूकीला मान्यता देण्यासंदर्भातही प्रश्नचिन्ह आहे, त्याचाही परिणाम म्युच्युअल फंड कंपन्यांच्या निर्णयावर झाला आहे. त्याखेरिज येस बॅंकेवर वाढत चाललेल्या थकित कर्जामुळेही चिंतेचे वातावरण आहे. 
 
आज दिवसअखेरीस राष्ट्रीस शेअर बाजारात येस बॅंकेचा शेअर 38.60 रुपये प्रति शेअर या पातळीवर होता.

अभिप्राय द्या!

Close Menu