ईएलएसएस म्युच्युअल फंड म्हणजे काय?
‘ईएलएसएस फंड’ प्रामुख्याने इक्विटी आणि इक्विटीसम साधनांमध्ये गुंतवणूक करतात. इक्विटी ही एकमेव अॅसेट श्रेणी आहे, जी महागाई दरापेक्षा तुलनेत उच्च परतावा देते. त्यामुळे दीर्घ काळासाठी ‘ईएलएसएस’मध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला उत्तम परतावे मिळतील; तसेच ’80सी’ अंतर्गत कर लाभही घेता येईल.
करबचत किती होऊ शकते?
प्राप्तिकर कायद्यातील कलम 80 सी अंतर्गत ईएलएसएस फंडात दीड लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. त्यानुसार 5 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये असलेल्यांना 7800, एखादी व्यक्ती 20 टक्के कराच्या चौकटीत येत असल्यास त्या व्यक्तीला 31 हजार रुपयांपर्यंत तर 30 टक्के कराच्या चौकटीत येत असल्यास अशा प्रकारे जास्तीत जास्त अंदाजे 47  हजार रुपयांपर्यंत करबचत करता येते.
ईएलएसएस का ?
‘ईएलएसएस’ फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यात गुंतवणुकीला मॅच्युरिटी तारीख नसते. लॉक-इन कालावधी उलटून गेल्यानंतरही तुम्ही त्यातील गुंतवणूक चालू ठेवू शकता. ‘ईएलएसएस’मध्ये दीर्घ काळ गुंतवणूक ठेवल्याने तुमच्या गुंतवणुकीवर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळत राहते.
‘एसआयपी’ पर्याय का?
 एकदम मोठय़ा रकमेची गुंतवणूक करू शकत नसल्यास, तुम्ही ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लान’ (एसआयपी) द्वारे मासिक पद्धतीने गुंतवणूक करू शकता.
योजना कशी निवडावी ?
तज्ञांच्या मते, फंड हाऊस निवडताना नावाजलेले फंड हाऊसच निवडावेत.
गुंतवणूक कुठे करता येईल?
गुंतवणूक करताना ऑनलाईन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे गुंतवणूक करता येईल. आपण सावंतवाडीतील शेअरखानच्या गवळी तिठ्यावरील कार्यालयात कार्यालीन वेळेत संपर्क साधून भेट देऊ शकता !!

 

अभिप्राय द्या!