1. आपल्याला खरोखरच पैशाची गरज आहे का ?
सध्या ‘इन्स्टंट लोन’ मिळत असल्याने बऱ्याचदा घराज नसताना कर्ज घेतले जाते. त्यामुळे अत्यावश्यक नसलेल्या बाबींसाठी कर्ज घेतले जाते. ते योग्य नाही.
उदा. दागिन्यांसाठी कर्ज घेणे, एक गाडी असताना दुसरी आणखी एक गाडी घेणे.
2. कर्ज आपल्याला परवडणारे आहे का ?
कर्जाची एकूण रक्कम, व्याज आणि त्यासाठीचा हप्ता (ईएमआय) आपल्याला परवडणारे आहेत का याचा आधी हिशोब केला पाहिजे. (हफ्ते आपल्या मासिक उत्पन्नाच्या 30 टक्क्यांहून कमी असावेत म्हणजे भविष्यासाठी बचत करता येते)
3. कर्ज उत्पादित आहे का ?
कर्ज घेऊन भविष्यात त्यातून उत्पन्न मिळणार असेल तर कर्ज घेणे योग्य असते.
उदा. रिअल इस्टेटतील गुंतवणूक जी भविष्यात उत्पन्न मिळवून देणार असेल आणि कर्जाचा हफ्ता त्यातून मिळणाऱ्या मासिक उत्पन्नापेक्षा कमी असेल.
शिक्षणासाठी घेतलेले कर्ज, ज्यातून मुले चांगले शिक्षण घेऊन भविष्यात आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होतील.
साधारण किती कर्ज घ्यावे?
1. तुमच्या कर्जाचे हफ्ते हा तुमच्या मासिक मिळकतीच्या 30 टक्क्यांहून कमी असावे. हे सूत्र पाळल्यास तुम्हाला घर खर्च, बचतआणि गुंतवणुकीसाठी पैसे शिल्लक राहतील.
2. कमीत कमी कर्ज घ्यावे – मोठ्या पगाराची नोकरी असली म्हणून जास्त कर्ज घेणे टाळावे.
“डिडरोट इफेक्ट” (Diderot effect) म्हणजे आपण एखादी वस्तू खरेदी केली की त्या वस्तूशी निगडित अजून एखादी वस्तू खरेदी करतो.
उदाहरणार्थ – घर घेतले की फर्निचर घेणे, नवीन ब्लेझर घेतला की शूज घेणे.
यामुळे आपला पगार जास्त असला तरी खर्च वाढतो आणि ठो भागविण्यासाठी कर्ज घेतले जाते.
ह्यामुळे खर्च वाढून बचत कमी होऊन गुंतवणुकीवर परिणाम होतोच होतो व तो हानिकारक असतो हे ध्यानी घ्यावे !! आणि अंथरूण पाहून हातपाय पसरावे हे लक्षात ठेवावे !!