अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आपला नवा ‘अॅक्सिस ईएसजी इक्विटी फंड’ बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड इक्विटी प्रकारातील फंड आहे. ईएसजी प्रकारातील दीर्घकालीन  चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये या फंडाद्वारे गुंतवणूक करण्यात येणार आहे. ईएसजी प्रकारातील कंपन्या म्हणजे एनव्हायर्नमेंटल, सोशल आणि गव्हर्नन्स घटकांशी संबंधित कंपन्या. 
 
चांगल्या कामगिरीसंदर्भातील इक्विटीतील नेहमीचे निकष आणि उत्तम ईएसजी घटक याआधारे या कंपन्यांची निवड केली जाणार आहे. ‘अॅक्सिस ईएसजी इक्विटी फंडाचा एनएफओ 22 जानेवारीपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. तर 5 फेब्रुवारी ही त्याची अंतिम मुदत असणार आहे. या नव्या फंडाचे व्यवस्थापन अॅक्सिस म्युच्युअल फंडाचे इक्विटीचे प्रमुख जिनेश गोपानी आणि फॉरेन सिक्युरिटीजचे फंड व्यवस्थापक हितेश दास करणार आहेत.
 
‘दर्जा आणि शाश्वत प्रकारच्या वाढीला केंद्रस्थानी ठेवण्याच्या आमच्या भूमिकेशीचाच पुढचा टप्पा ईएसजी प्रकार हा आहे

अभिप्राय द्या!