आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात करबचत करण्यासाठी अनेक गुंतवणूकदार विविध पर्याय शोधात असतात. प्राप्तिकराच्या कलम 80 सी अंतर्गत बचतीचा लाभ मिळेल अशा अनेक योजना / पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. त्यातल्या ठराविक पर्यायांचा घेतलेला  आढावा !!
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पब्लिक प्रॉव्हिडन्ट फन्ड (‘पीपीएफ’) ही केंद्र सरकारची, पूर्ण संरक्षण असलेली व करबचत मिळवून देणारी सर्वात लोकप्रिय योजना आहे. निश्चित परतावा, करबचत, दीर्घकालीन गुंतवणूक ही या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. या योजनेला 15 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी आहे. मात्र गुंतवणूकदाराला काही आर्थिक अडचण आल्यास तो लॉक-इन कालावधीच्या आधी यातील काही रक्कम काढू शकतो. कोणतीही व्यक्ती आपल्या ‘पीपीएफ’ खात्यात एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची बचत करू शकते. या योजनेमधील गुंतवणुकीचा व्याजदर सतत बदलत असतो. सध्याचा दर आहे 7.90 टक्के इतका आहे.
राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS): एनपीएस
ही एक निवृत्तीवेतन योजना असून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे.
सद्यस्थितीत कलम 80 सीच्या अंतर्गत मिळणाऱ्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या रकमेव्यतिरिक्त 80 सीसीडी (1बी) अनुसार ‘एनपीएस’मधील 50 हजारांच्या गुंतवणुकीवर अतिरिक्त करवजावट मिळते. त्यामुळे करदात्यांना एकूण दोन लाख रुपयांच्या करवजावटीचा फायदा मिळतो.
इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स म्हणजेच ईएलएसएस (ELSS):
करबचतीसाठी अनेकजण ईएलएसएस फंडाला पसंती देतात. करबचतीसोबत उत्तम परतावा देणारी अशी ही योजना आहे. याचे ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड असे दोन प्रकार असतात. यामध्ये तीन वर्षांचा लॉक इन पिरिएड असून गुंतवणूक करताना शक्यतो नावाजलेले फंड हाऊसच निवडावेत. तसेच यामधील लॉक-इन कालावधीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.  क्लोज एंडेड फंडांचा लॉक-इन कालावधी दहा वर्षे तर ओपन एंडेड फंडांचा कालावधी तीन वर्षांचा असतो. गुंतवणूक सल्लागार बहुतांश वेळा ओपन एंडेड फंडांची निवड करण्यास पसंती देतात. यामध्ये  दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. यामध्ये वर्षाला जास्तीत जास्त 46 हजार रुपयांपर्यंत करबचत करता येणे शक्य आहे.
यासंबंधात काही विस्तृत माहिती हवी असल्यास शेअरखान सावंतवाडी पाटील tower येथे संपर्क साधावा !!

 

अभिप्राय द्या!