ग्राहकांना अधिक अनुकूल ठरणाऱ्या आणि त्यांच्या गरजांनुरुप विमा योजना बाजारात याव्यात यासाठी आयआरडीएआय प्रयत्नशील आहे. शिवाय ग्राहकांना आमिष दाखवून चुकीच्या पद्धतीने विमा योजना विकल्या जाण्याच्या पद्धतीलाही आयआरडीएआय आळा घालू इच्छिते. त्यामुळे आयआरडीएआयने विमा कंपन्यांना काही नवीन निकष लागू केले आहेत. 
 
त्यामुळेच काही नॉन लिंक्ड विमा योजना, युलिप योजना, तीन नॉन लिंक्ड ग्रुप विमा योजना इत्यादी योजना एलआयसी बंद करते आहे. यामध्ये सिंगल प्रिमियम एन्डोव्हमेंट प्लॅन, न्यू मनी बॅंक-20 वर्षे, न्यू जीवन आनंद, अनमोल जीवन 2, लिमिटेड प्रिमियम एन्डोव्हमेंट प्लॅन, न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन, जीवन लक्ष्य, जीवन तरुण, जीवन लाभ, न्यू जीवन मंगल, भाग्य लक्ष्मी प्लॅन, आधार पिलर, आधार शिला, जीवन उमंग, जीवन शिरोमणी, बिमा श्री आणि एलआयसी मायक्रो सेव्हिंग्स इत्यादी एलआयसीच्या योजनांचा यामध्ये समावेश आहे.
आयआरडीएआयने विमा कंपन्यांना 31 जानेवारीपर्यत नवीन निकषांत न बसणाऱ्या योजना बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

अभिप्राय द्या!