आयटीआय म्युच्युअल फंडाने नवा स्मॉल कॅप फंड बाजारात आणला आहे. ‘आयटीआय स्मॉल कॅप फंड’ असे या नव्या फंडाचे नाव आहे. या फंडाचा एनएफओ आज खुला होत असून 10 फेब्रुवारी ही त्याची अंतिम मुदत आहे. नवा फंडाचा बेंचमार्क निफ्टी स्मॉल कॅप 100 टीआरआय हा असणार आहे. या फंडात गुंतवणूक करण्याची किमान रक्कम 5,000 रुपये इतकी आहे. त्यानंतर 1 रुपयाच्या पटीत पुढील गुंतवणूक करता येणार आहे. 
 
या फंडाद्वारे 65 टक्के गुंतवणूक इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित गुंतवणूक प्रकारात आणि स्मॉल कॅप प्रकारातील कंपन्यांमध्ये केली जाणार आहे. तर उर्वरितत 35 टक्के गुंतवणूक स्मॉल कॅप व्यतिरिक्त कंपन्यांमध्ये, डेट प्रकारात आणि मनी मार्केट प्रकारात केली जाणार आहे. या फंडाचे व्यवस्थापन संयुक्तपणे जॉर्ज हेबेर जोसेफ आणि प्रदीप गोखले करणार आहेत. 

अभिप्राय द्या!