मराठीमध्ये  “लाखाचे बाराहजार करणे ” अशी   एक जुनी म्हण आहे. म्हणूनच या लेखाचे शीर्षक “एक हजारात दहा लक्ष” असे वाचकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी ठेवले असावे असे आपल्याला वाटेलच . पण नाही , ही खरेच वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच कमाल आहे एका म्युच्युअल फंडाची!!

reliance growth या फंडामध्ये ८ऑक्टोबर १९९५ रोजी ज्यांनी एक हजार रुपये ठेवले त्यांना आज रोजी दहा लक्ष रुपये मिळाले आहेत !! बावीस वर्षातील ही या फंडामधील वाढ आहे.पण फार थोड्या लोकांना हा फायदा घेता आला आहे .कारण त्यांच्याकडे थांबून दीर्घावधीमधील आपल्या गुंतवणुकीची वाढ पाहण्याचा ” पेशन्स ” नव्हता . आपल्यापैकी अनेकांकाकडे तो नाही .

या फंडाच्या बाबतीतसुद्धा सन २००७-०८ हा कालावधी अत्यंत जिकिरीचा होता . या काळात या फंडाने उणे 25% हा परतावा तेव्हा दिल्याने अनेकांनी आपले मुद्दल वाचविण्याच्या हेतूने या फंडातून ” स्वीच ” होणे पसंत केले ! अश्या पडत्या काळात ज्यांनी या फंडाला आधार दिला त्यांना हा ” हजाराचे दहा लाख ” देणारा आजचा दिवस पाहता आला आहे !

मुळात हा फंड ” मिडकॅप ” या प्रकारचा आहे . त्यामुळे बाजार जेव्हा घसरत असतो तेव्हा हा फंड सुद्धा कमी परतावा देणार हे गृहीत धरणे आवश्यक आहे .

पण अनेकांना हे पसंत नसते व असे अनेक पडत्या काळात अश्या फंडांची साथ सोडतात , पण “धूर्त”अश्याच वेळी आपली गुंतवणूक वाढवतात व दीर्घवधीत भरघोस नफा कमावतात ! व या परिस्थितीला सरावलेले लोक ” सिप” स्वीकारून जादा युनिट्स मिळवून दबा धरून आपला कावा साधतात !

आपण सामान्य लोक अश्या बाबतीत ” फ़्लेकसी सिप ” हा पर्याय सुद्धा स्वीकारू शकतो ! आणि परिस्थितीवर मात करणेही !

अभिप्राय द्या!