पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे बचत खाते असेल आणि तुमच्याकडे अजूनही ‘मॅग्नेटिक स्ट्रीप’वाले एटीएम कार्ड असेल तर, १ फेब्रुवारीपूर्वी ‘ईएमव्ही चिप’ असणारे एटीएम कार्ड घेणे बंधनकारक करणे आवश्यक आहे. पोस्ट खात्याने ग्राहकांना जानेवारी महिना संपण्यापूर्वी मोबाइल क्रमांकही अपडेट करण्याची सूचना केली आहे.

पोस्ट खात्याने जारी केलेल्या निवेदनानुसार जे ग्राहक ३१ जानेवारीपर्यंत आपले जुने एटीएम कार्ड बदलणार नाहीत, त्यांचे कार्ड फेब्रुवारीपासून ब्लॉक करण्यात येणार आहे. मोबाइल क्रमांक अपडेट करण्यासाठी किंवा सध्याचे एटीएम कार्ड बदलण्यासाठी पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक खातेधारकांना आपापल्या शाखेत जाणे आवश्यक आहे

अभिप्राय द्या!