आयडीएफसी म्युच्युअल फंडाने ‘आयडीएफसी एमर्जिंग बिझनेस फंडा‘ची घोषणा केली आहे. इक्विटी प्रकारातील ही स्मॉल कॅप योजना आहे. 3 ते 17 फेब्रुवारी दरम्यान योजनेचा एनएफओ गुंतवणूकदारांसाठी खुला असणार आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान 5 हजार रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. ही योजना स्मॉलकॅप संबंधित योजनांमध्ये किमान 65 टक्के व कमाल 100 टक्के तर इतर इक्विटी प्रकारात शून्य टक्के ते 35 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करेल.
 
सर्वात महत्वाचे म्हणजे किमान 100 रुपये प्रतिमहिना स्वरूपात देखील या योजनेत एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करता येणार आहे. 
 
‘आयडीएफसी एमर्जिंग बिझनेस फंडासाठी S&P BSE 250 Small Cap TRI बेंचमार्क इंडेक्स आहे. आयडीएफसी एएमसीच्या इक्विटीचे प्रमुख अनुप भास्कर आणि वरिष्ठ व्यवस्थापक विराज कुलकर्णी हे संयुक्तपणे या फंडाचे व्यवस्थापन करतील.
 
या फंडसाठी एन्ट्री लोड लागू असणार नाही मात्र 12 महिन्यांच्या आत 10 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर 1 टक्का एक्झिट शुल्क आकारले जाईल. 

अभिप्राय द्या!