pocket money पासून credit कार्ड मिळेपर्यंतचा प्रवास हा तरुणाईचा एक uptrend असतो . म्हणजेच शाळा , – कॉलेज ,- उच्चशिक्षण व प्लेसमेंट हाच तो प्रवाह होय ! पण एकदा का नोकरी लागली कि बर्याच जणांना अनावश्यक वस्तू खरेदीचा मोह आवरत नाही व हाती credit कार्ड आल्यावर तर खरेदी होतच राहते .पण हीच ती वेळ व हाच तो क्षण असतो की ज्यावेळी अनावश्यक खरेदी थांबवून बचतीची सवय लावून नियोजनबद्ध गुंतवणुकीची सवय अंगीकारण्याचा !!
दरमहाचे बारीक सारीक खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून जे पैसे शिल्लक राहातील त्याचे short term goal, medium term goal , long term goal , व आपली निवृत्ती याचे निश्चीतपणे सुनियोजन करून आपली बचत योग्य रीतीने SIP द्वारे गुंतविण्याचे !
घर /flat/ गाडी यासाठी जर आपण मोठे कर्ज घेतले असल्यास त्याचे व्याज कसे कमीत कमी देय होईल हे सुद्धा ठरवता येते . ( यासाठी वेब साईट वरील icons पाहणे ). मुलांचे शिक्षण , विवाह ,आपल्या पालकांचे आजारपण, यासाठी सुद्धा नियोजन आपण करू शकतो . उगाचच भिडेखातर अनेक जीवन विम्याच्या policy गुंतवणूक म्हणून न घेता उचित प्रकारचा term plan घेवून कुटुंबियांचे संरक्षण आपणच विचारांती करू शकतो.
आपल्या गुंतवणूकीची liquidity ठरवणे हे आपलेच काम आहे त्यासाठी तज्ञ सल्लागाराचा सल्लाही घेणे आवश्यक असते . असे सल्लागार हे सल्ला देत घरोघरी फिरत नाहीत हे वेळीच लक्षात घेणे हितावह आहे .
व सर्वात महत्वाचे म्हणजे आपली गुंतवणूक ही SEBI सलग्न बांधील असलेल्या सूचीबद्ध योजनाद्वारे होत आहे याचाही वेळोवेळी आढावा घेणे तेवढेच महत्वाचे आहे .
very useful data for young investors.
ok