गेल्याच आठवड्यात चिंतन हरीया (Head Product Development & strategy ICICI Pru fund) यांना भेटण्याचा योग आला.
यावर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे म्युचुअल फंड संबंधातील होणाऱ्या बदलांचा आढावा त्यांनी घेतला!!
त्यांच्या म्हणण्यानुसार –
1) पुढील आर्थिक वर्षापासून Dividend Distribution Tax (DDT) लागू झाल्यामुळे यापुढे dividend option असलेले फंड गुंतवणूदाराने घेण्याचे टाळावे.
2) नवीन Tax slab हा कमी उपन्न असलेल्या (below 5.0 Lakhs )गुंतवणूकदारांना स्विकारणे फायदेशीर ठरू शकते. आणि अशा मिळवत्या वर्गाकडून Consumption सेक्टर फायद्यात जाऊ शकतो त्यामुळे Consumption सेक्टरचा समभाग असलेले म्युच्युअल फंड जास्त फायदा देऊ शकतात.
3) अर्थमंत्र्यांनी आपल्या एकंदर दीड तासाच्या भाषणात पहिली तीस मिनिटे ही शेतकरी वर्गाला देण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पातील तरतुदीसंबंधात निवेदन देण्यासाठी खर्च केली होती. याचाच अर्थ सरकारतर्फे Agriclture संबंधातील गुंतवणूक वाढवल्याने त्या क्षेत्रातील समभाग असलेल्या फंडाचा परतावा पुढील दोन चार वर्षे निश्चितच चांगला असू शकतो.
4) Corporate Tax कमी केल्यामुळे आणि नवउत्पादाकांना (startup) हा tax १५% ठेवण्याचा निश्चित केल्यामुळे या क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढू शकेल तरी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील चढउतारचा प्रभाव आपल्या गुंतवणुकीवर न पडू देता SIPसुरु ठेवणे जास्त हितावह आहे.
आणि कोणालाहि यासंबंधात अधिक माहिती हवी असल्यास माझेशी संपर्क साधणेस हरकत नाही !!