म्युच्युअल फंडात सर्वसामान्य नागरिकांकडून गुंतवणुकीचे प्रमाण वाढत असताना नवी दिल्ली, गोवा आणि महाराष्ट्र ही राज्ये दरडोई एयूएम आणि एयूएम ते जीडीपी गुणोत्तरांच्या बाबतीत अव्वल ठरली आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (अॅम्फी) डिसेंबर 2019 पर्यंतची यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. संबंधित राज्यातील म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक आणि फोलिओ यांचे प्रमाण काढून दरडोई एयूएम काढण्यात आला आहे.
या यादीत नवी दिल्ली 1.53  लाख रुपयांच्या दरडोई एयूएमसह प्रथम क्रमांकावर आहे, तर गोवा आणि महाराष्ट्र अनुक्रमे 1.16 लाख रुपये आणि 99, 760 रुपये प्रति दरडोई एयूएमसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. टॉप 10 राज्यांच्या यादीत चंदिगढ, हरियाणा, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.
एयूएम ते जीडीपी गुणोत्तर यादीत देखील दिल्ली, गोवा आणि महाराष्ट्र ही राज्ये आघाडीवर आहेत. मात्र 66.5 टक्क्यांसह महाराष्ट्र प्रथम स्थानावर तर 56.7 आणि 35.8 टक्क्यांसहित दिल्ली आणि गोवा ही राज्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

अभिप्राय द्या!