सुंदरम म्यु्च्युअल फंड कंपनीने नवा डायनामिक अॅसेट अॅलोकेशन फंड बाजारात आणला आहे. ‘सुंदरम बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड’ असे या योजनेचे नाव आहे. हा एनएफओ 14 फेब्रुवारीपासून गुंतवणूकीसाठी खुला होत असून त्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी आहे. त्यानंतर 12 मार्चनंतर हा फंड पुन्हा गुंतवणूकीसाठी आणि व्यवहारासाठी खुला होणार आहे.
 
‘तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी संपत्ती निर्मिती करण्यासाठी इक्विटी हाच सर्वात योग्य गुंतवणूक प्रकार आहे. मात्र इक्विटी योजनांमध्ये अस्थिरता आणि जोखीमसुद्धा मोठी असते. फिक्स्ड अॅसेट प्रकाराद्वारे ही जोखीम संतुलित करता येते. त्यामुळे परतावा आणि जोखीम यांचा समन्वय साधता येतो. सुंदरम बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंडाचे जोखीम आणि परतावा यांचा असाच समतोल साधण्याचे उद्दिष्ट आहे’, असे मत सुंदरम म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील सुंदरम यांनी व्यक्त केले आहे.
 
‘सुंदरम बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंडाद्वारे इक्विटी, फिक्स्ड इन्कम, आरईआयटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्हमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. कंपनीचे इक्विटी प्रकारासाठीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी एस कृष्णकुमार आणि इक्विटी फंड मॅनेजर एस भारत हे या फंडाचे व्यवस्थापन करणार आहेत. 

अभिप्राय द्या!