कर्ज घेताना आपण अनेकदा ऐकतो, की सिबिल स्कोअर खूप महत्त्वाचा आहे. जास्त स्कोअर असायला पाहिजे. पण हे बरेचदा माहीत नसते, की सिबिल स्कोअर म्हणजे काय? तो कसा मोजला जातो? चांगला स्कोअर किती? तो कशामुळे वाढतो आणि कशामुळे तो कमी होतो? चला तर मग जाणून घेऊया…
1. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) म्हणजे सिबिल. या एजन्सीला रिझर्व्ह बॅंकेनेने “क्रेडिट रेटिंग’ द्यायला अधिकृत केले आहे. प्रत्येकाच्या ‘क्रेडिट हिस्टरी’वर सिबिल स्कोअर ठरतो. हा स्कोअर 3 अंकी असतो आणि तो 300 ते 900 दरम्यान मोजला जातो.
सिबिल स्कोअर चांगला की वाईट माहिती
300 – 549 अत्यंत वाईट – कुठलीही बॅंक तुम्हाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देत नाही
550-649 बरा – अत्यंत कमी बॅंका अथवा एनबीएफसी तुम्हाला कर्ज अथवा क्रेडिट कार्ड ऑफर करतील – जास्त इंटरेस्ट लावतात
650 -749 चांगला – सर्व बॅंका तुम्हाला कर्ज आणि क्रेडिट कार्ड ऑफर करतील
750-900 खूप चांगला – सर्व बॅंका तुम्हाला कर्ज आणि क्रेडिट कार्ड ऑफर करतील
2. सिबिल स्कोअर कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो?
– कर्जाची नियमित परतफेड होत आहे वा नाही
– क्रेडिट कार्ड बिलाचे पूर्ण पेमेंट
– एकाच वेळेस अनेक कर्ज घेणे (मुख्यतः अनसिक्युर्ड कर्ज)
– वारंवार कर्जाची मागणी करणे
– तुमच्या क्रेडिट कार्ड लिमिटच्या 40 टक्क्यांपेक्षा जास्त “युटीलायझेशन रेशो’
– क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्यासाठी सतत विनंती
3. सिबिल स्कोअर वाढवायला कोणती काळजी घ्यावी –
– कर्जाची नियमितपणे परतफेड करावी
– क्रेडिट कार्ड बिलाचे पूर्ण पेमेंट करावे (फक्त मिनिमम ड्यू पे करत राहिल्यास सिबिल स्कोअरवर फरक पडू शकतो)
– क्रेडिट कार्ड लिमिटच्या 30 टक्क्यांहून कमी वापर करावा
– सिबिल स्कोअर नियमितपणे तपासावा, तसेच सिबिल रिपोर्टपण नियमितपणे तपासावा
– खूप जास्त कर्ज घेऊ नये