सरकारी निवृत्तीवेतनधारकांसाठी एक खूशखबर आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने निवृत्तीवेतनधारकांकडून घरपोच  हयातीचा दाखला ( LIFE CERTIFICATE ) स्वीकारण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. नुकताच सरकारने यासंदर्भात आदेश काढला आहे. यामुळे बॅंका आणि पोस्ट ऑफिसमध्ये हयातीचा दाखला देण्यासाठी होणाऱ्या धावपळीतून ‘पेन्शनर्स’ची सुटका होणार आहे. ज्यांना हयातीचा दाखला बँकेत जाऊन सादर करणे शक्य नाही, अशा निवृत्तीवेतनधारकांना ६० रुपये शुल्क आकारून घरपोच स्वीकारावा आणि प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट आदेश सरकारने बँकांना दिले आहेत.

अभिप्राय द्या!