रेस्टॉरंट चेन बार्बेक्यू नेशन हॉस्पिटॅलिटी लवकरच आपला आयपीओ बाजारात दाखल करणार आहे. आयपीओच्या माध्यमातून 1,000 ते 1,200 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. यासंदर्भात कंपनीने नुकताच सेबीकडे अर्ज दाखल केला आहे.
 
फ्रेश पब्लिक इश्यूच्या माध्यमातून 275 कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. तर ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून 98,22,947 शेअरची विक्री करण्यात येईल. याशिवाय प्री – आयपीओच्या माध्यमातून देखील 150 कोटी उभारण्याची कंपनीची योजना आहे. आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या एकूण रकमेपैकी 205 कोटी रुपये कर्ज भरण्यासाठी वापरली जाईल. 
 
बार्बेक्यू नेशन हॉस्पिटॅलिटीमध्ये राओफ धनानी आणि सुचित्रा धनानी कय्युम धनानी आणि सयाजी हॉटेल्स, सयाजी हाऊसकीपिंग सर्व्हिसेस यांची 60.24 टक्के मालकी आहे. तर, राकेश झुनझुनवाला यांच्या  2.05 टक्के भागीदारीसह CX पार्टनर्स यांची 33.28 टक्क्यांची मालकी आहे. 
 
बार्बेक्यू नेशन हॉस्पिटॅलिटीचे सध्या भारतभर 138 आणि युएई, ओमान आणि मलेशियामध्ये 7 आउटलेट आहेत. 

अभिप्राय द्या!