अत्यंत कमी जोखीम, एका रात्रीतून मिळणारी मॅच्युरिटी आणि जलद लिक्विडीटी अशी वैशिष्ट्ये असेलेला ओव्हरनाईट फंड गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. म्युच्युअल फंडाची शिखर संस्था अॅम्फीने सादर केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, 31 जानेवारीपर्यंत मागील दहा महिन्यात ओव्हरनाईट फंडाचा एयुएम तब्बल पाच पटींनी वाढला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात 11,566.84 कोटी रुपयांचा असलेला एयुएम 52,524.98 कोटींवर पोचला आहे.
ओव्हरनाईट फंड हा डेट फ़ंडाचा एक गुंतवणूक प्रकार आहे. यामध्ये एका दिवसात परिपक्व होणाऱ्या रोख्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. लिक्विड फंडांना पर्याय म्हणून ओव्हरनाईट फंडांकडे पाहिले जाते. तरलता आणि सुरक्षितता हे या फंडाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

 

अभिप्राय द्या!