“बालक पालक” ह्या  काही वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेल्या  मराठी सिनेमाची कथा  मी इथे सांगणार कि काय असे तुम्हाला वाटतेय ? हो असेल तर तुम्ही चुकलाय .

पालकानी आपल्या बालकाच्या सक्षमिकरणासाठी कोणत्या लाभदायक योजना स्वीकाराव्यात यासंबंधात महत्वपूर्ण कथा मी सांगणार आहे .व म्हणून एका अर्थी ही सिनेमाचीच कथा आहे.

प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी काही कमी पडू नये असे वाटते ,व याच मानासिकतेचा फायदा विमा प्रतिनिधी उठवतात .कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाल्यावर त्याच्या भविष्यासाठी  child plan घेऊन असा प्रतिनिधी घरात येतो , व आपली गोंडस योजना मांडतो . त्यामध्ये या नवागत बालकासाठी वार्षिक विमा हप्ता  रू   २२५००/- चा असतो व सलग २४ वर्षे हा हप्ता पालकाने भरावयाचा असतो , यामध्ये पालकांना रू. पाच लक्ष चे विमा संरंक्षण असते , व त्याचा मृत्यू झाल्यास वार्षिक हप्ता भरणेपासून मुक्ती असते . व परतावाच्या रुपात बालकाच्या १८ , २० , व २२ व्या वर्षी रू. एक लक्ष मिळणारे असून २५  व्या वर्षी   रू. साडेनऊ लक्ष मिळतील असेही सांगण्यात येते . ही रक्कम आकर्षक असल्याने पालक ही योजना स्वीकारतो . पण inflation मुळे हा परतावा त्यावेळी खूपच नगण्य असतो त्यामध्ये मुलाचे कुठलेच खर्च भागत  नाहीत . यामधील आपली गुंतवणूक दरवर्षी २२५०० प्रमाणे २४ वर्षात रू ४,९५,०००/- होते .

पण हीच गुंतवणूक जर आपणदोन वेगवेगळ्या  balance फंडमध्ये केल्यास त्यापासून रू .७५ लक्ष ते रू ९८ लक्ष प्राप्त होऊ शकतात व या रकमेतून पाल्याचे उच्च शिक्षण कोणतेही कर्ज न घेता पूर्ण होऊ शकते !! कोणत्याही फंड हाउसचा balance fund १२% ते १३ % CAGR चा परतावा देतोच देतो . त्यामुळे घरी आलेल्या प्रतिनिधीच्या कथेत भूलण्यापेक्षा साधक बाधक विचार करून balance फंड कडे पालकांनी वळणे निश्चीतच हितावह आहे , अर्थात विमाछत्रासाठी term plan घ्यावाच !

 

 

अभिप्राय द्या!