निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बचत करण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. हा आपल्या आयुष्याचा असा काळ असतो जेव्हा आपल्याला स्वतंत्र आणि चिंतामुक्त आयुष्य जगण्याची इच्छा असते. यासाठी सेवानिवृत्ती निधी तयार करणे हे गरजेचे असते, जेणेकरून उतारवयात आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकेल. छोट्या कुटुंबांच्या वाढत्या ट्रेंडमुळे सेवानिवृत्तीचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. काम करत असताना आणि धडधाकट आयुष्य जगतानाच निधी उभारायला सुरवात केली तर आपल्याला नियमित आवक सुरू राहते. या निधीतून निवृत्ती योजना खरेदी केल्या जाऊ शकतात. यातून मिळणारे उत्पन्न आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत सुरू राहते. गृहिणीसाठी पती या योजना खरेदी करू शकतात आणि संयुक्त परतावा पर्याय निवडू शकतात. यामुळे, काही अघटीत घडले तरीही त्यांना आयुष्यभर आर्थिक लाभ मिळत राहतील.

महिला कुटुंब एकत्र ठेवतात आणि त्याला शिस्त देखील लावतात. आपले आणि कुटुंबाचे आयुष्य सुरक्षित करणे ही, जितकी त्यांच्या जोडीदाराची जबाबदारी असते, तितकीच ती महिलांचीदेखील असते. सध्याच्या दिवसात NPS हि एक अत्यंत चांगली योजना नव्या स्वरुपात सुरु असून पूर्ण कुटुंबाला निवृत्ती सुरक्षा देण्याची ताकद या योजनेमाद्ग्ये आहे !!

गृहिणी म्हणून घर खर्च पूर्णपणे महिलांच्या हाती असते आणि व्यावसायिक म्हणून तिच्याकडे अनेकदा मोठी शिल्लक उरते. ह्या छोट्या बचतीतून अनेकदा दागिने किंवा एखादे उपकरण विकत घेतले जाते, जे क्षणिक आनंद देतात. या पैशाचा किमान एक भाग बचत आणि विमा योजनेत गुंतवणे हा चांगला मार्ग आहे. यामुळे एक निधी उभा राहील आणि आर्थिक सुरक्षा मिळेल.

भारतीय महिला केवळ गृहिणी राहिल्या नसून त्यांनी अनेक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. आज महिला अर्थार्जनाबरोबरच आर्थिक व्यवस्थापन व नियोजन यातही पुढाकार घेत आहेत. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य उपभोगतानाच आर्थिक सुरक्षेचे भान देणेही गरजेचे आहे…यासाठी बचतीतून समृद्धी गाठण्यासाठी महिलानी सक्रीय राहण्यासाठी या महिला दिनाच्या सर्वाना शुभेच्छा  !!

अभिप्राय द्या!