कोरोना विषाणूच्या फैलावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा मोठा फटका कंपन्यांच्या कामगिरीवर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यासंदर्भात सेबीने आपला नियम शिथिल केला आहे. आता कंपन्यांना चौथ्या तिमाहीचे निकाल 30 जूनपर्यत जाहीर करता येणार आहेत. कोरोना विषाणूच्या फैलावामुळे कंपन्यांना कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगावे लागत आहे किंवा काही कामकाज तहकूब करावे लागत आहे. यासर्वांचा विपरित परिणाम कंपन्यांच्या कामकाजावर झाला आहे. 
 
सेबीच्या नियमानुसार शेअर बाजारात नोंदणी झालेल्या कंपन्यांना तिमाही संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत त्या तिमाहीचे निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सेबीने चौथ्या तिमाही निकालांसंदर्भात कंपन्यांना वाढीत मुदत दिली आहे. याशिवाय कंपन्यांना सादर कराव्या लागत असलेल्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स अहवालासाठीही सेबीने एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. 

अभिप्राय द्या!