आता चालू असलेल्या तेजीत सेन्सेक्सवर २८,८७५ आणि निफ्टीवर ८,३०० स्तर राखल्यास तेजीचे प्रथम लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३१,७०० ते ३२,५०० आणि निफ्टीवर ९,३०० ते ९,५०० असे असेल. हा स्तर ओलांडण्यास निर्देशांक अपयशी ठरल्यास ती क्षणिक मंदी असेल. शाश्वत तेजी ही सेन्सेक्सवर ३३,३०० आणि निफ्टीवर १०,००० च्या स्तरावर निर्देशांक सातत्याने एक महिना टिकल्यावरच येईल.
या वर्षांत गुंतवणूकदारांना खरेदीसाठी असंख्य संधी येतील, तेव्हा ‘आय मिस द बस’ हे कधीही न म्हणता येणार नाही. असे समजा..