विषाणूचा संसर्ग देशात वेगाने वाढत आहे. करोनामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून, जवळपास सर्वच उद्योगांना याचा फटका बसला आहे. या क्षेत्रांना आर्थिक समस्येतून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालय लवकरच विशेष पॅकेजची घोषणा करणार आहे. केंद्र सरकारकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर होणारे हे दुसरे विशेष अर्थसाह्य असणार आहे.

गेल्या महिन्यात सरकारने धान्य आणि रोकड हस्तांतरण या स्वरूपात एकूण १.७० लाख कोटी रुपयांची मदत समाजातील गरजू व गरीब यांना दिली होती. आता सरकार आर्थिक फटका बसलेल्या विविध क्षेत्रांसाठी विशेष अर्थसाह्य योजना तयार करत आहे. २१ दिवसांचे लॉकडाउन संपल्यानंतर या क्षेत्रांना ही मदत दिली जाणार आहे.

अभिप्राय द्या!