सध्या lock down मुळे बहुतेकजण घरीच राहत असून प्रत्येकाकडे थोडा – अधिक फावला वेळ आहे ! या वेळेचा सदुपयोग आपणही करवा अशी धनलाभ ची इच्छा आहे !
त्या दृष्टीने आपण आपले personal finance वित्तनियोजन करण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे खाली देत आहे ते काळजीपूर्वक वाचावेत आणि आपले वित्तानियोजन आपणच करावे ही अपेक्षा आहे !!
१) आपले insurance audit करा !
आपल्या प्रत्येकाकडे जीवन विमा हा असतोच पण त्याचे हप्ते , मिळणारा परतावा , आणि जीवन कवच याचा आपण केव्हाच विचार केलेलं नसतो. तो करून आपले कवच कमी असेल तर टर्म प्लान घ्यायचे निश्चित करावे आणि त्याचबरोबर मेडिकल policy सुद्धा घ्यावी !!
२) आपले asset allocation तपासा !
आपली एकूण गुंतवणूक किती आहे ? त्याचा परतावा केव्हा व कसा मिळणारा आहे ? त्यात काही अनुत्पादक बाबी आहेत का ? आणि सध्याच्या घसरत्या व्याजदराच्या काळात aset माफ्ह्ये बदल करणे आवश्यक आहे का ? याचा विचार आपणच प्रथम करावा आणि आवश्यकतेनुसार तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा !!
३) balance sheet करा !
आपली एकूण देणी काय आहेत ? आपली येणी कशी व किती आहेत ? त्यावर या lockdown मुळे काय परिणाम होणारा आहे ? या सर्वांचा आताच विचार या सुट्टीच्या कालावधीतच करणे हितावह आहे!!
४) मुलांना आर्थिक धडे द्या !
आपण गुंतवणुकीसंदर्भात घरात जे काही बोलतो त्याचा नकळत थोडा तरी परिणाम आपल्या मुलांवर होताच असतो , तरी आत्ता आपण घरी असल्याने आपल्या मुलांना आर्थिक गुंतवणुकी संबंधी थोडेफार धडे देण्यासाठी वेळ देणे भविष्याच्या दृष्टीने खूप हितावह आहे ! अर्थात मुलांचे वय हा सगळ्यात मोठा factor असू शकतो !!
५) वेळेचा सदुपयोग करा !
या मोकळ्या वेळेचा सदुपयोगआपले महत्वाचे कागदपत्र योग्यरित्या जतन करण्यासाठी करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सर्व कागदपत्रांची माहिती आपल्या जोडीदाराला देण्यास विसरू नका!!