करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे

आधीच चिंताक्रांत असणाऱ्या गुंतवणूकदारांना आणि नॅशनल पेन्शन योजनेच्या (एनपीएस) खातेधारकांना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) दिलासा दिला आहे. पीएफआरडीएच्या आदेशानुसार करोनाशी संबंधित उपचारांच्या खर्चासाठी अंशतः रक्कम काढता येणार आहे. या संदर्भात पीएफआरडीएने सर्व संबंधित गुंतवणूकदार आणि एनपीएस खातेधारकांना उद्देशून एक निवेदन जाहीर केले आहे. त्यानुसार केंद्र सरकारने करोनाला एक गंभीर आणि प्राणघातक आजार असल्याचे म्हटले असल्याने त्याच्या उपचारासाठी गुंतवलेलली रक्कम काढण्याची सवलत खातेधारकांना देण्यात आली  आहे.

अभिप्राय द्या!