गुंतवणूक विभागून कशी करायची?
समजा एखाद्या व्यक्तीचे (अविवाहित आणि स्वतंत्र) मासिक वेतन अर्थात निव्वळ वेतन ५० हजार रुपये आहे आणि याव्यतिरिक्त वर्षाला दोन लाख रुपये इन्सेंटिव्ह/बोनस रुपाने मिळतात, असे गृहीत धरले आहे. अशा व्यक्तीने गुंतवणूक कशी केली पाहिजे, हे पाहू.
– एकूण रोकड ८ लाख रुपये
– मासिक भाडे/ईएमआय १२००० गुणिले १२ = १.४४ लाख रुपये
– मासिक खर्च १०००० गुणिले १२=१.२० लाख रुपये
– गुंतवणूक योग्य रक्कम ५,३६,००० रुपये
– पोस्ट ठेवी/बँक ठेवी/सरकारी रोखे ४० टक्के एकूण २.१५ लाख रुपये
– पीपीएफ (मासिक ६२५० रुपये गुणिले १२ महिने) ७५ हजार रुपये
– शेअर/एसआयपी वर्षाला एक लाख रुपयांपर्यंत
– सोने-चांदी वर्षाला एक लाख रुपयांपर्यंत
– उरलेली रक्कम (४६ हजार रुपये) ही रोख स्वरूपात बँकेत किंवा घरी असावी
दिलेल्या उदाहरणात संबंधित व्यक्तीच्या खात्यावर ४६ हजार रुपये शिल्लक राहतात. या रकमेच करायचे काय, असा प्रश्न पडू शकतो. हीच रक्कम आपल्याला रोकड म्हणून वापरता येणार आहे. त्यामुळेच आर्थिक संकट आल्यास वा अडीअडचणीच्या काळात हीच रक्कम उपयोगात येते.
महोदय, विशिष्ट उद्दीष्टांसाठी कसे नियोजन आणि गुंतवणुक करावी याबाबत मार्गदर्शन करावे.
phone call at 11.45 am today