सध्याच्या चिंताजनक स्थितीत तुमच्या कानावर सतत नकारात्मक बातम्या येत आहेत मात्र त्याचा विचार न करता बातम्यांच्या / हेडलाईन्सच्या पलिकडे जात विचार केला पाहिजे. शिस्तबध्द पध्दतीने गुंतवणूक, दीर्घकालीन मुदतीचे उद्दीष्ट ठेवणे, गुंतवणूकीचा विस्तार आणि क्षेत्र याबाबत जागरूक असणे आणि अस्थिर स्थितीत मन शांत आणि स्थिर ठेवणे ही दीर्घकालीन गुंतवणूकीच्या यशाची काही सुत्रे आहेत.
 
 पुढील तीन ते पाच वर्षासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूकीसंदर्भात हे महत्वाचे मुद्दे पहा
 
• शेअरचे मुल्य वाढत असल्याने गुंतवणुकीसाठी शेअर हे मालमत्ता निर्मितीचे उत्कृष्ट साधन असून दीर्घकालीन मुदतीत उत्तम परतावा देण्याची त्यांच्यात क्षमता असते.
 
• स्मॉल कॅप शेअरवर जास्तीत जास्त परतावा मिळणार असून त्यानंतर मिड-कॅप आणि लार्ज कॅपचा क्रमांक लागणार आहे.
 
• पुढील  एक, तीन आणि पाच वर्षाच्या कालावधीसाठी स्मॉल कॅप शेअरमध्ये लार्ज कॅपच्या तुलनेत अधिक फरकाने परतावा देण्याची क्षमता दिसत आहे.
 
• दशकातील ही सवोत्तम संधी आहे. मुलभूत घटक हे बळकट असून बाजाराचे मुल्य हे दोन दशकातील सर्वाधिक अल्प पातळीवर आलेले असल्याने ही संधी गुंतवणूकीसाठी अतिशय उत्तम संधी आहे.
 
• उज्ज्वल भवितव्यासाठी आपण सर्व जण अशा स्थितीतही स्वतःला सज्ज करु शकतात. बाजाराची तळपातळी कोणती आणि कोरोना विषाणूचे परिणाम किती आणि काय काय होणार याबाबत कोणालाच थांगपत्ता लागत नसला तरी भविष्यातील सोनेरी दिवसांसाठी आपण सर्व जण स्वतःला सिध्द करु शकतात.
आता गुंतवणूक करत यशासाठी पुढील काही वर्षांसाठी प्रतीक्षा करणे हाच उत्तम यश पदरात पाडून घेण्याचा योग्य मार्ग होय.

अभिप्राय द्या!