“ संधी “ ज्याला साधता आली तो जिंकला असे म्हणतात ते काही उगाचच नाही हां. संधिसाधू ही जरी म्हण असली तरी कायमच तिचा वापर उपहासात्मकच केला पाहिजे असे सध्याच्या काळात मात्र नाही.

किंबहुदा शेअर मार्केटच्या बाबतीत तर अजिबातच नाही !!

जीवनात माणसाला अनेक परीक्षेना बसण्याची संधी मिळते पण एखादी परीक्षा बसूच शकलो नसतो तर आपण आज आहे त्यापेक्षा खूप वेगळ्या ठिकाणी असलो असतो असेही वाटते .काहीजण म्हणतात की संधी एकदाच दार ठोटावते, पण मला हे पटत नाही. प्रयत्न करणाऱ्याला अनेक संधी मिळतात पण संधीचे सोने करणे आपल्याच हाती असते हे मात्र निश्चित !

अहो माझे एक मित्र नव्यानेच  demat खाते उघडून कोणते शेअर्स घ्यावेत यासंबंधी अनेक वेळा माझेशी चर्चा करायचे . एक वेळेस, साधारणपणे सहा महिन्यापूर्वी , त्यांना मी state बँक of इंडिया चे शेअर घ्या असे सांगितले , व त्यावेळेस त्याचा भाव रू १५० / प्रती समभाग होता . पण महाशय अजून कमी होऊ द्या असे म्हणत बसले पण कसचे काय आज हा भाव रू २९५ /- पर्यंत जावून आला !! ही रू १५० ची संधी त्यांनी सोडली आणि व सहा महिन्यात आपली गुंतवणूक जवळजवळ दुप्पट होण्याची संधी त्यांनी मात्र हुकवलीच !!

शेअर बाजारात कुठल्याही समभागाच्या बाबतीत उतार चढाव होताच राहतात , आपण fudamental चांगल्या असलेल्या नावाजलेल्या कंपनांच्या समभागांची निवड करून ज्यावेळी हे समभाग वर्षातील निम्न स्तरावर असतील त्याचवेळी खरेदीची संधी साधली पाहिजे , व ज्यावेळी हे समभाग उच्चतम स्तरावर असतील त्यावेळी विक्री करून नफा मिळवण्याची संधी साधणे शिकले पाहिजे !!

Equity म्युच्युअल फंडांच्या बाबतीत सुद्धा हेच तत्व लागू असते.

फक्त SIP आपण केव्हाही सुरु करू शकतो .

शेअर बाजारात हे खरेदीचे तंत्र साधणे म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य मिळविणे आहे.यासाठी अनेकजण तंत्र / मंत्र शिकवतात पण योग्य वेळी खरेदीची संधी साधणे हेच खरे तंत्र होय !

 

 

 

अभिप्राय द्या!